साखरवाडीची पोटनिवडणूक रणधुमाळी
फलटकरांनी पूर्व नियोजित कटकारस्थान रचून विश्वासघाताने अडचणीत आणले-प्रल्हादराव साळुंखे-पाटील
साखरवाडी गणेश पवार
आमच्यावर आलेली संकटे ही पूर्वनियोजित कटकारस्थान व विश्वासघाताने आणली गेली मात्र आलेल्या संकटाला धैर्याने सामना आजही करीत असून आमची न्यायालयीन लढाई सुरू असून शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहणार आहे.विक्रम भोसले १९९५ पासून ग्रामपंचयावर निवडणून जात असून आपल्या कार्यकर्तृत्वाचा जोरावर भविष्यात तालुका पातळीवर दिसतील यात शंका नाही असे मत तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांनी साखरवाडी वार्ड क्रमांक दोनच्या पोटनिवडणुकीच्या प्रचार शुभारंभ समारंभात व्यक्त केले. यावेळी माजी सरपंच विक्रमसिंह भोसले, सरपंच रेखा जाधव उपसरपंच अक्षय रुपनवर, माणिक आप्पा भोसले, सुरेश पवार, हिरालाल पवार,मारुती माडकर,राजेंद्र शेवाळे,मनोज भोसले उपस्थित होते.
प्रल्हादराव साळुंखे-पाटील म्हणाले पुढे म्हणाले, पोटनिवडणूक दोन तुळबळ्य उमेदवारांच्यात होईल अशी अपेक्षा होती मात्र समोरचा उमेदवार बघता फक्त निकालाची औपचारिकता बाकी आहे.असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ज्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला त्यांनीच विश्वासघात करून आम्हाला अडचणीत आणले. विक्रम भोसले म्हणाले, ग्रामपंचायत च्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम आज पर्यंत केले असून भविष्यात यामध्ये खंड पडणार नाही. कारखाना, डिसलरी आमच्या गावात व रोजगार इतर तालुक्यातील लोकांना हा कुठला न्याय? गावातील प्रत्येक पुढाऱ्याचा बायोडाटा माझ्याकडे असून बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना धमकावणे बंद करा अन्यथा जशास तसे उत्तर दिल जाईल. यावेळी व्यापारी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment