Posts

Image
 सुरवडीत प्रलंबित रेल्वे क्रॉसिंग रस्त्याचे डांबरीकरण सुरू... साखरवाडी गणेश पवार सुरवडी रेल्वे क्रॉसिंग  रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम आज दिनांक 20 पासून सुरू झाले असून सुरवडी ग्रामपंच्यातचे सरपंच जितेंद्र साळुंखे- पाटील यांनी जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील व ग्रामपंचयत सुरवडी यांच्यामार्फत  रेल्वे प्रशासन व माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे सदर रस्त्यासाठी केलेल्या पाठ पुराव्याला यश आले असल्याचे सांगितले.  फलटण-लोणंद रोडवरून सुरवडी गावात जाणाऱ्या रस्त्यावर रेल्वेचा भराव झाल्याने  रेल्वे प्रशासनाने पूर्वी कडे 300 मीटर अंतरावर बोगदा पूल उभारून वाहतूक या बोगदा पुलाखालून वळवली  मात्र  त्यावेळी केलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम तत्कालीन ठेकेदारानें अतिशय निकृष्ट दर्जाचे केले त्यामुळे अवघ्या सहा महिन्यातच या रस्त्यावर मोठं मोठाले खड्डे पडले.  परिणामी या खराब रस्त्याचा मागील 3 ते साडेतीन वर्षापासून सुरवडी,साखरवाडी व आजू बाजूच्या पंचक्रोशीतील  वाहनधारक,कंपनी व कारखान्यातील कामगार,ऊस वाहतूक करणारी वाहने यांना...

साखर कारखान्याला पूर्ववैभवाकडे नेणार्यांच्या की बंद पडणाऱ्यांच्या पाठीशी राहणार डी के पवार

 साखर कारखान्याला पूर्ववैभवाकडे नेणाऱ्यांच्या की कारखाना बंद पाडणारांच्या पाठीशी राहणार : डी. के. पवार     साखरवाडी गणेश पवार बंद पडलेला साखरवाडी कारखाना पुन्हा चालू करुन साखरवाडी बाजारपेठेला पूर्व वैभवाप्रत आणण्याबरोबर शेतकरी, कामगार, व्यापारी वर्गाला दिलासा देणाऱ्या श्रीमंत रामराजे यांच्या पाठीमागे रहायचे की ज्यांनी कारखाना बंद पाडून सर्वांचे नुकसान केले त्यांच्या पाठीमागे रहायचे याचा निर्णय ग्रामपंचायत पोट निवडणुकीतून होणार असल्याचे प्रतिपादन महानंदचे उपाध्यक्ष डी. के. पवार यांनी केले आहे.      साखरवाडी ता. फलटण येथील वॉर्ड क्रमांक २ च्या पोटनिवडणूक प्रचार रणधुमाळीचा शेवटचा दिवस असल्याने राष्ट्रवादी पुरस्कृत राजे गटाचे उमेदवार राजेंद्र काशिनाथ भोसले यांच्या प्रचारार्थ राजे गटाकडून साखरवाडी गावामध्ये प्रचंड पदयात्रेद्वारे जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. महानंद दूध डेअरीचे व्हा. चेअरमन डी. के. पवार, पंचायत समिती माजी सभापती शंकरराव माडकर, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन नितीन शाहूराज भोसले, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष उमाकांत भोसले, सागर कां...

साखरवाडीत राजे गटाचे रॅलीद्वारे शक्तीप्रदर्शन

 साखरवाडीत राजेगटाचे रॅलीद्वारे शक्तिप्रदर्शन... साखरवाडी गणेश पवार साखरवाडी तालुका फलटण येथील वार्ड क्रमांक दोनच्या पोटनिवडणुकी प्रचाराची रणधुमाळीचा शेवटचा दिवस असल्याने राष्ट्रवादी पुरस्कृत राजे गटाचे उमेदवार राजेंद्र काशिनाथ भोसले यांच्या प्रचारार्थ राजे गटाकडून साखरवाडी गावामध्ये पायी रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. महानंदा दूध डेरी चे व्हाईस चेअरमन डी के पवार पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन नितीन शाहू राजे भोसले व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष उमाकांत भोसले, सागर कांबळे, संजय भोसले,आर बी भोसले,सतीश माने फलटण तालुका साखर कामगार युनियनचे राजेंद्र गायकवाड, गोरख भोसले, संतोष भोसले, महेश भोसले, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र भोसले, विद्या भोसले, गौरी देवी माडकर,सुनंदा पवार, कमलताई माडकर,सीमा फडतरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी झालेल्या कोपरा सभेत शंकरराव माडकर म्हणाले, साखरवाडीचा सर्वांगीण विकास भविष्यात जर करायचा असेल तर  ग्रामपंचायत  विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या विचाराची...

श्रीदत्त इंडिया साखरवाडीची २७६१ एफ आर पी जमा

 श्रीदत्त इंडिया साखरवाडीची एकरकमी एफ आर पी 2761जमा कामगारांना दिली 12%वेतनवाढ.. साखरवाडी गणेश पवार साखरवाडी तालुका फलटण येथील श्रीदत्त इंडिया  प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याने आपल्या तिसऱ्या गळीत हंगामासाठी आलेल्या ऊसाला 2761 रुपये देण्याचे जाहिर केले असून आपली एक रक्कमी एफआरपीची देण्याची परंपरा कायम राखत नोव्हेंबर महिन्यात दिनांक22 ते 30 पर्यंत गाळपास आलेल्या ऊसाला प्रति टन 2761 प्रमाणे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली असल्याची माहिती कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली असून कारखान्यातील कायम, हंगामी,संकलीत कामगारांना वेतनवाढीचा त्रिपक्षीय समितीच्या झालेल्या करारानुसार 12 टक्के वेतनवाढ  नोव्हेंबरच्या महिन्यापासून लागू केली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

साखरवाडीची पोटनिवडणूक रणधुमाळी

 फलटकरांनी पूर्व नियोजित कटकारस्थान रचून  विश्वासघाताने अडचणीत आणले-प्रल्हादराव साळुंखे-पाटील साखरवाडी  गणेश पवार आमच्यावर आलेली संकटे ही पूर्वनियोजित कटकारस्थान व विश्वासघाताने आणली गेली मात्र आलेल्या संकटाला धैर्याने सामना आजही करीत असून आमची न्यायालयीन लढाई सुरू असून शेवटच्या क्षणापर्यंत  लढत राहणार आहे.विक्रम भोसले १९९५ पासून  ग्रामपंचयावर निवडणून जात असून आपल्या  कार्यकर्तृत्वाचा जोरावर भविष्यात तालुका पातळीवर दिसतील यात शंका नाही असे मत  तालुक्‍याचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांनी साखरवाडी वार्ड क्रमांक दोनच्या पोटनिवडणुकीच्या प्रचार शुभारंभ समारंभात व्यक्त केले. यावेळी माजी सरपंच विक्रमसिंह भोसले, सरपंच रेखा जाधव उपसरपंच अक्षय रुपनवर, माणिक आप्पा भोसले, सुरेश पवार, हिरालाल पवार,मारुती माडकर,राजेंद्र शेवाळे,मनोज भोसले उपस्थित होते.  प्रल्हादराव साळुंखे-पाटील म्हणाले पुढे म्हणाले, पोटनिवडणूक दोन तुळबळ्य उमेदवारांच्यात होईल अशी अपेक्षा होती मात्र समोरचा उमेदवार बघता  फक्त निकालाची औपचारिकता बाकी आहे.असे म्हटले तर वावगे ठरणार ...