सुरवडीत प्रलंबित रेल्वे क्रॉसिंग रस्त्याचे डांबरीकरण सुरू...
साखरवाडी गणेश पवार
सुरवडी रेल्वे क्रॉसिंग रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम आज दिनांक 20 पासून सुरू झाले असून सुरवडी ग्रामपंच्यातचे सरपंच जितेंद्र साळुंखे- पाटील यांनी जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील व ग्रामपंचयत सुरवडी यांच्यामार्फत रेल्वे प्रशासन व माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे सदर रस्त्यासाठी केलेल्या पाठ पुराव्याला यश आले असल्याचे सांगितले. फलटण-लोणंद रोडवरून सुरवडी गावात जाणाऱ्या रस्त्यावर रेल्वेचा भराव झाल्याने रेल्वे प्रशासनाने पूर्वी कडे 300 मीटर अंतरावर बोगदा पूल उभारून वाहतूक या बोगदा पुलाखालून वळवली मात्र त्यावेळी केलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम तत्कालीन ठेकेदारानें अतिशय निकृष्ट दर्जाचे केले त्यामुळे अवघ्या सहा महिन्यातच या रस्त्यावर मोठं मोठाले खड्डे पडले. परिणामी या खराब रस्त्याचा मागील 3 ते साडेतीन वर्षापासून सुरवडी,साखरवाडी व आजू बाजूच्या पंचक्रोशीतील वाहनधारक,कंपनी व कारखान्यातील कामगार,ऊस वाहतूक करणारी वाहने यांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.अनेक वाहनचालक या रस्त्याचा वापर टाळीत लाबंणीच्या बडेखान रस्त्याला वळसा घालून प्रवास करीत होते.मात्र आज सुरू करण्यात आलेल्या रस्त्याच्या दुरुस्थिती बाबत वाहनधारक व नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
Comments
Post a Comment