श्रीदत्त इंडिया साखरवाडीची २७६१ एफ आर पी जमा
श्रीदत्त इंडिया साखरवाडीची एकरकमी एफ आर पी 2761जमा कामगारांना दिली 12%वेतनवाढ..
साखरवाडी गणेश पवार
साखरवाडी तालुका फलटण येथील श्रीदत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याने आपल्या तिसऱ्या गळीत हंगामासाठी आलेल्या ऊसाला 2761 रुपये देण्याचे जाहिर केले असून आपली एक रक्कमी एफआरपीची देण्याची परंपरा कायम राखत नोव्हेंबर महिन्यात दिनांक22 ते 30 पर्यंत गाळपास आलेल्या ऊसाला प्रति टन 2761 प्रमाणे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली असल्याची माहिती कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली असून कारखान्यातील कायम, हंगामी,संकलीत कामगारांना वेतनवाढीचा त्रिपक्षीय समितीच्या झालेल्या करारानुसार 12 टक्के वेतनवाढ नोव्हेंबरच्या महिन्यापासून लागू केली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
Comments
Post a Comment