साखरवाडीत राजे गटाचे रॅलीद्वारे शक्तीप्रदर्शन
साखरवाडीत राजेगटाचे रॅलीद्वारे शक्तिप्रदर्शन...
साखरवाडी गणेश पवार
साखरवाडी तालुका फलटण येथील वार्ड क्रमांक दोनच्या पोटनिवडणुकी प्रचाराची रणधुमाळीचा शेवटचा दिवस असल्याने राष्ट्रवादी पुरस्कृत राजे गटाचे उमेदवार राजेंद्र काशिनाथ भोसले यांच्या प्रचारार्थ राजे गटाकडून साखरवाडी गावामध्ये पायी रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. महानंदा दूध डेरी चे व्हाईस चेअरमन डी के पवार पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन नितीन शाहू राजे भोसले व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष उमाकांत भोसले, सागर कांबळे, संजय भोसले,आर बी भोसले,सतीश माने फलटण तालुका साखर कामगार युनियनचे राजेंद्र गायकवाड, गोरख भोसले, संतोष भोसले, महेश भोसले, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र भोसले, विद्या भोसले, गौरी देवी माडकर,सुनंदा पवार, कमलताई माडकर,सीमा फडतरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी झालेल्या कोपरा सभेत शंकरराव माडकर म्हणाले, साखरवाडीचा सर्वांगीण विकास भविष्यात जर करायचा असेल तर ग्रामपंचायत विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या विचाराची असणे अत्यंत आवश्यक असून त्या अनुषंगाने उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीत आपला उमेदवार विजयी होणे आवश्यक आहे. डी के पवार म्हणाले की, बंद पडलेला कारखाना व बाजारपेठेला ऊर्जितावस्था देण्याचे काम रामराजे यांनी केले आहे त्यामुळे सुज्ञ मतदारांनी आपले मत राजे गटाच्या उमेदवारालाच देऊन त्याला प्रचंड मतांनी विजयी करावे. सूत्रसंचालन सुनील माने व आभार सुधीर भोसले यांनी मानले. यावेळी कार्यकर्ते,व्यापारी बहुसंख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment